15 September 2017 - श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे चित्रकला स्पर्धेत उज्ज्वल यश


लातूर : (दि. १५), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्यावतीने व महाराष्ट्र फुटबॉल मिशन १ मिलीयन कार्यक्रमांतर्गत गुरुवार, दि. १४/०९/२०१७ रोजी भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत श्रीकिशन सोमाणी विद्यालय लातूर येथील इयत्ता ९वी वर्गातील चि. हार्दिक माळी हा विद्यार्थी गट क मधून प्रथम क्रमांकाने यशस्वी झाल्याबद्दल लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. जी. श्रीकांत यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन स्पर्धक विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. उपस्थित क्रीडा अधिकारी सौ. नीलिमा अडसूळ यांनी त्याचे अभिनंदन केले. या स्पर्धक विद्यार्थ्यास कलाशिक्षक सागर माडकर यांचे मार्गदर्शन लाभले. अभिनव मानव विकास संस्थेचे सर्व सन्माननिय पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले.