17 January 2019 - अणदूर येथील विज्ञान जत्रेत प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश


दि. १७ व १८ जानेवारी २०१९ रोजी अणदूर येथे घेण्यात आलेल्या विज्ञान जत्रेतील प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्राथमिक गटात चि. चिलमे प्रणव याने प्रथम क्रमांक तर चि. क्षितीज म्हेत्रे याने द्वितीय क्रमांक मिळविला. माध्यमिक गटात चि. पृथ्वीराज मुळे याने प्रथम क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले!
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. विजया कुलकर्णी, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, संजय क्षीरसागर, पर्यवेक्षिका सौ. सुनिता बजाज तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.