2 Feb 2024 - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत विद्यालयातील बालनाट्य विभागीय पातळीवर प्रथम

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई द्वारा आयोजित नाट्य कलेचा जागर - बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील प्राथमिक विभागाच्या संघाने इंद्रधनू या बालनाट्याचे सादरीकरण केले.आपल्या विद्यालयाच्या संघास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असून उपांत्य फेरीसाठी या नाटकाची निवड झाली आहे. बक्षिसाचे स्वरूप दहा हजार रुपये व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र. विद्यालयाच्यावतीने सर्व सहभागी बाल कलाकारांचे अभिनंदन!!!!