१५ फेब्रुवारी २०२४ - बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष श्री.प्रकाश पारखी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद


बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष श्री.प्रकाश पारखी यांनी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना एकपात्री प्रयोग, नाट्यछटा, स्वगत, कथाकथन यातील फरक प्रात्यक्षिकातून खूप छान समजावून सांगितला. त्यांनी सादर केलेल्या कृतीगीताने व 'जादूचे घर' ही गोष्ट सांगताना काढलेल्या वेगवेगळ्या आवाजाने विद्यार्थी भारावून गेले. याप्रसंगी लातूर येथील प्रसिद्ध नाट्य कलाकार अमोल गोवंडे उपस्थित होते.