अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचालित, श्रीकिशन सोमाणी विद्यालयाची स्थापना सन १९९३ साली लातूरमध्ये झाली. श्रीकिशन सोमाणी प्राथमिक विद्यालय हे कायम विनाअनुदानित तत्त्वावर चालविले जात असून, माध्यमिक विद्यालय हे महाराष्ट्र स्वयं अर्थसहायित शाळा अधिनियम २०१२ अंतर्गत मान्यताप्राप्त तत्त्वावर चालविले जाते. विद्यालयात इयत्ता बालवाडी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी व संस्कारक्षम नागरिक बनविण्याच्या उद्देशाने विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. मराठवाड्यामध्ये उपक्रमशील असे सेमी इंग्रजी माध्यमाचे एक उत्कृष्ट व दर्जेदार विद्यालय म्हणून विद्यालयाची ख्याती ही शहरातील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि जाणकार लोकांना आहे. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव आणि सांस्कृतिक मूल्ये जोपासण्याचा प्रयत्न नियोजनबद्ध पद्धतीने सातत्याने सुरू आहे.

विद्यालयाची स्मरणिका

विद्यालयातील ठळक घडामोडी

विद्यालयात बालवाडी ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. संस्थेचे सचिव मा. कमलकिशोरजी अग्रवाल यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध प्रयोगांचे निरीक्षण केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रदर्शनास पालकांनीही मोठ्या संख्येने भेट दिली.
स्व. कांतीलालजी कुचेरिया यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन द्वारा आयोजित चित्रकला स्पर्धेत आपल्या विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी बक्षीस पटकावले. त्यातील तीन प्रथम, दोन द्वितीय व एक तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे.
प्रथम क्रमांक विजेते:- * चि. शौर्य बिराजदार- इयत्ता 1ली * चि.पार्थ साठे- इयत्ता 3री * कु. तेजस्विनी टिपराळे- इयत्ता 5वी
द्वितीय क्रमांक विजेते:- * कु. क्रांती साळुंके- इयत्ता 4थी * चि. समर्थ जाधव - इयत्ता 5वी
तृतीय क्रमांक विजेता:- * चि . रुद्रदीप देशमुख - इयत्ता 6वी
स्पर्धेसाठी सहकार्य केल्याबद्दल विद्यालयातील कलाशिक्षक श्री. सागर माडकर यांचा सत्कार करण्यात आला. संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन! 💐💐💐