COMPETITIVE EXAMINATIONS


शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा कायम राखण्यासाठी आमचे विद्यालय विद्यार्थ्यांसाठी अनेक शालाबाह्य उपक्रम राबवित असते. याच्याच अनुषंगाने विद्यालय विद्यार्थ्यांकडून अनेक स्पर्धा परीक्षांचा नियमित सराव करून घेत असते. स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची अभ्यासूवृत्ती प्रतिभा व बौद्धिक कौशल्ये ओळखण्यासाठी मदत होते. लहान वयात विद्यार्थ्यांच्या कौशल्याची पातळी ओळखणे म्हणजे काही विद्यार्थ्यांवर दबाव टाकून त्यांना ज्ञानी बनवणे असे होत नाही. कौशल्य आत्मसात करण्यासाठी सतत सराव आणि शिक्षणाची गरज असते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणे म्हणजे आपल्या पाल्याला उत्तम मार्गदर्शनाने त्यास सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करणे हे होय. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र कार्यक्षमता, विश्लेषणात्मक क्षमता, समस्या सोडवण्याची कौशल्ये व धेय्यनिष्ठ विचारसरणी निर्माण करतात. विद्यालयात घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

अ. क्र. स्पर्धा परीक्षेचे नाव कोणत्या इयत्तेसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम अधिक माहितीसाठी संकेतस्थळ
I.M.O. ३ री ते १० वी गणित www.sofworld.org
गणित संबोध ५ वी आणि ८ वी गणित www.maharashtraganitmahamandal.com
गणित प्राविण्य ५ वी आणि ८ वी गणित www.maharashtraganitmahamandal.com
गणित प्रज्ञा ५ वी आणि ८ वी गणित www.maharashtraganitmahamandal.com
B.T.S. ६ वी गणित, भाषा, बुद्धिमत्ता
M.O.M. ५ वी ते १० वी गणित, विज्ञान, बुद्धिमत्ता
M.T.S. जळगाव ६ वी गणित, भाषा, बुद्धिमत्ता
M.T.S. पुणे ८ वी ते १० वी गणित, भाषा, बुद्धिमत्ता www.mtsexam.org
M.S.S. स्कॉलरशिप ५ वी गणित, भाषा, बुद्धिमत्ता www.mscepune.in
१० H.S.S. स्कॉलरशिप ८ वी गणित, भाषा, बुद्धिमत्ता www.mscepune.in
११ M.S.O. ५ वी ते १० वी गणित, विज्ञान
१२ N.S.O. ३ री ते १० वी विज्ञान www.sofworld.org
१३ I.E.O. ३ री ते १० वी इंग्रजी www.sofworld.org
१४ NCFE-NFLAT ८ वी ते १० वी अर्थशास्त्र, गणित www.ncfeindia.org/nflat
१५ I.P.M. ३ री ते ९ वी गणित
१६ NSTSE ३ री ते १० वी विज्ञान, गणित
१७ N.C.O. ५ वी ते १० वी संगणक www.sofworld.org
१८ जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ५ वी आणि ८ वी गणित, विज्ञान, बुद्धिमत्ता www.nvshq.org
१९ डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा ६ वी आणि ९ वी विज्ञान www.msta.net.in