सन्माननीय पालकबंधु आणि भगिनी,
सस्नेह नमस्कार.
२१ वे शतक हे माहिती व तंत्रज्ञानाचे असल्याने जीवनविषयक दृष्टिकोनात बरीच स्थित्यंतरे घडून येताना दिसत आहेत. शिक्षण ही मानवी जीवनाची चौथी मूलभूत गरज आहे. आज विविध स्वरूपात शिक्षणाचे माध्यम आणि विद्याशाखा उपलब्ध झालेल्या आहेत.
अभ्यासक्रमाच्या पुस्तकाला जेव्हा जीवनशिक्षणाचे पान चिकटते, तेव्हा शाळा नुसती शाळा न राहता ती जीवनशिक्षणाची प्रयोगशाळा बनते. आमच्या विद्यालयाची शिस्त, सुसंस्कार आणि स्वाध्यायाबरोबरच, "एकच ध्यास आणि विद्यार्थ्यांचा घडवू विकास" या ध्येयाने आमच्या विद्यालयाची दमदार वाटचाल सुरू आहे.
आमच्या विद्यालयास आपल्या पाल्याच्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. बंधु-भगिनींनो, आपल्या पाल्याच्या शाळाप्रवेशासाठी निवड तुमची, जबाबदारी आमची. पण सहकार्य मात्र पालकांचे आवश्यक आहे. आपल्या पाल्याच्या विकासाकरिता वेळ आणि संधी येईल म्हणून वाट पाहात बसू नका, ती आपल्या अचूक निर्णयाने प्राप्त करा. श्रीकिशन सोमाणी विद्यालयामध्ये मी आपले हार्दिक स्वागत करतो.

रमाकांत स्वामी
मुख्याध्यापक