अभिनव आंतरशालेय निबंधलेखन स्पर्धा


अ.मा.वि. संस्थेच्या रौप्यमहोत्सवाच्या औचित्याने विद्यालयात ७ जानेवारी २०१७ रोजी अभिनव आंतरशालेय निबंधलेखन स्पर्धा घेण्यात आली. या निबंधलेखन स्पर्धेत श्रीकिशन सोमाणी विद्यालायासह शहरातील १५ विद्यालयातील एकूण ६० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला; परंतु प्रत्यक्ष निबंधलेखन स्पर्धेत एकूण ५७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रस्तुत निबंधलेखन स्पर्धा घोषित केल्याप्रमाणे अभिनव अशा स्वरूपाची होती. या निबंधलेखन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांना पूर्वतयारी करता यावी म्हणून स्पर्धा परिपत्रकाद्वारे खालील विषय अभ्यासार्थ देण्यात आले होते.
१. २१व्या शतकाच्या अखेरीस पृथ्वीचा अंत?
२. शिक्षण पद्धतीतील काळानुरूप बदल: माझी संकल्पना
३. जाहिरातींचा भूलभुलैय्या
स्पर्धेच्या प्रारंभी स्पर्धा संयोजक व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजेंद्र लातूरकर यांनी स्पर्धकांना स्पर्धेचे नियम, स्पर्धेचे विषय व निबंधलेखनाचे स्वरूप यासंदर्भात विशेष मार्गदर्शन केले. निबंधलेखन स्पर्धेत आपल्या लेखन कलेचे दर्शन घडवू इच्छिणाऱ्या स्पर्धकाला परिपत्रकाद्वारे कळविण्यात आलेल्या विषयांच्या सूचीमधून एक विषय निवडून त्यावर आपल्या विचारांचे प्रकटीकरण करणे अपेक्षित होते. प्रस्तुत निबंधलेखन स्पर्धेच्या संदर्भात विद्यालयाने निर्धारित केलेल्या विवक्षित नियामांबरहुकुम निबंधलेखन स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. या स्पर्धेतील एकूण ५७ निबंधलेखकांच्या निबंधांचे परीक्षण दोन तज्ज्ञ परीक्षांद्वारे करण्यात आले. यात श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजेंद्र लातूरकर व श्री महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील मराठीचे अभ्यासक प्रा. शंकर भोसले यांचा यात महत्वपूर्ण समावेश होता. प्रस्तुत निबंधलेखन स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१७ रोजी लातुरातील ख्यातकीर्त विधिज्ञ आशिष बाजपाई यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या पारितोषिक वितरण समारंभास संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, सचिव कमलकिशोर अग्रवाल, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. एम.एस. कुलकर्णी, रौप्यमहोत्सव समितीचे संयोजक अतुल देऊळगांवकर, संस्थेचे कोषाध्यक्ष जयेश बजाज, सहसचिव सुभाष कासले, डॉ. रमेश जाजू, पोलीस निरीक्षक रहेमान सय्यद, संस्थासदस्य लक्ष्मीकांत सोमाणी, मुख्याध्यापक सुभाष मिश्रा, उपमुख्याध्यापक राजेंद्र लातूरकर, पर्यवेक्षकद्वय गिरीश कुलकर्णी व विजया कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या पारितोषिक वितरण समारंभास विद्यार्थी, शिक्षक, निमंत्रित, विजयी स्पर्धक, विजयी स्पर्धकांचे मार्गदर्शक शिक्षक व पालक यांची उपस्थिती होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशाला प्रमुख सुभाष मिश्रा, उपमुख्याध्यापक राजेंद्र लातूरकर, पर्यवेक्षकद्वय गिरीश कुलकर्णी व विजया कुलकर्णी, मराठी विषय शिक्षक-शिक्षिका अनुक्रमे विनोद जाधव, सौ. उत्तरा शहरकर, सौ. अश्विनी खर्डेकर व सौ. तनुजा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेत विजयी ठरलेले स्पर्धक खालीलप्रमाणे आहेत: