ABHINAV EXAMINATION PATTERN
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी विद्यालय सतत वेगवेगळे नवोपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून विद्यालयात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा अभिनव असा दर्जेदार आकृतिबंध खालीलप्रमाणे तयार केला आहे:
- विद्यालयात घेतल्या जाणाऱ्या घटक चाचणी, सत्र व सराव परीक्षांचे प्रत्येकी तीन संच बनविले जातात.
- प्रत्येक घटक चाचणी, सत्र व सराव परीक्षेसोबत त्या विषयातील सामान्यज्ञानाची परीक्षाही घेतली जाते.
- प्रत्येक विषयाच्या लेखी परीक्षेसोबत तोंडी परीक्षाही घेतली जाते.
- इ. १०वी वर्गाच्या SSC बोर्ड पॅटर्नअनुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकूण चार सराव परीक्षा घेतल्या जातात.
- इ. ७वी ते १०वी वर्गासाठी इंग्रजी विषयाची लेखन कौशल्यावर आधारित परीक्षा (Writting Skill Exam) घेतली जाते.
- शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता चाचणी घेतली जाते.
- वर्गात शिकविलेल्या प्रत्येक पाठावर आधारित आठवडी परीक्षा घेतली जाते.