14 January 2019 - शासकीय चित्रकला-रेखाकला(एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


दि. १४ जानेवारी २०१९ रोजी महाराष्ट्र राज्य कला संचालनालय द्वारा घेतलेल्या शासकीय चित्रकला-रेखाकला परीक्षा २०१८ चा निकाल घोषित झाला. त्यामध्ये एलिमेंटरी परीक्षेत अ श्रेणीत ०३ विद्यार्थी उत्तीर्ण, ब श्रेणीत ११ विद्यार्थी उत्तीर्ण व क श्रेणीत ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून इंटरमिजिएट परीक्षेत अ श्रेणीत ०५ विद्यार्थी उत्तीर्ण, ब श्रेणीत १० विद्यार्थी उत्तीर्ण व क श्रेणीत ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले!
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. विजया कुलकर्णी, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, संजय क्षीरसागर, पर्यवेक्षिका सौ. सुनिता बजाज तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.