18 Jan 2024 - रोटरी चित्रकला स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

रोटरी क्लब ऑफ लातूर मिड-टाऊन तर्फे स्व. कांतीलालजी कुचेरिया यांच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात आपल्या विद्यालयातील कु. टिपराळे तेजस्विनी (इ.तिसरी) व चि. काळे अथर्व (इ.चौथी) या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या दोन विद्यार्थ्यांचा सायकल व प्रमाणपत्र देऊन रोटरी क्लब तर्फे सत्कार करण्यात आला. तसेच इ.चौथी मधील चि. रुद्रदीप देशमुख व कु. साक्षी बागल या दोन विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक आणि इ. दुसरीतील कु. गार्गी जाधव व कु. स्वरा शहा या दोन विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. विजेत्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले !