19 September 2018 - श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे कलाक्षेत्रात घवघवीत यश


(दि. १९/०९/२०१८, बुधवार) नवनीत तर्फे ०१ ऑगस्ट २०१८ रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. चि. प्रज्वल अजमेरा (गट- अ), कु. सायली कोल्हे (गट- ब), कु. समुद्रे सायली (गट- क), या विद्यार्थांना हॉलीडे पॅकेज कुपन बक्षीस स्वरुपात मिळाले. चि. प्राजक्ता भोसले (२ री ड), कु. अमरजा देशमुख (३ री ड), चि. रुद्र सोमवंशी (३ री ड), कु. श्रेया झांबरे (४ थी क) या बक्षीस पात्र विद्यार्थांचे नवनीत कंपनी तर्फे शैक्षणिक साहित्य देऊन कौतुक करण्यात आले.

या सर्व विद्यार्थांना विद्यालयाचे कलाशिक्षक सागर माडकर आणि कलाशिक्षिका सुहासिनी नीलेवार यांचे मार्गदर्शन लाभले. या समारंभा प्रसंगी संस्था पदाधिकारी, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. विजया कुलकर्णी, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, संजय क्षीरसागर, पर्यवेक्षिका सौ. सुनिता बजाज तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले.