29 October 2018 - ३४व्या राष्ट्रीय ब्रेनोब्रेन स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश


दि. २९ ऑक्टोबर २०१८ रोजी चेन्नई येथे ब्रेनोब्रेन स्कील डेव्हलपमेंटच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय ब्रेनोब्रेन स्पर्धेत श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे विद्यार्थी चि. हर्षल हजारे (इ.४थी अ) व चि. आदित्य पाटील (इ. २री ब) या दोन विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकाविले. हे यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. विजया कुलकर्णी, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, संजय क्षीरसागर, पर्यवेक्षिका सौ. सुनिता बजाज तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.