२७ फेब्रुवारी २०२५ - विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. शैलजा दामरे (लातूर जिल्हा संयोजक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक) उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्याचा परिचय करून दिला व मराठी भाषेचे महत्त्व सांगितले.