४ मार्च २०२५ - विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. महेशजी बिलुगुडी (भौगोलिक क्षेत्र व्यवस्थापक, महानगर गॅस) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महानगर गॅसचे मार्केटिंग ऑफिसर मा. रोहितजी बाहेती व संस्थेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची मांडणी केली. उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रयोगांची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.