अभिनव मानव विकास संस्था लातूर द्वारा संचालित, श्रीकिशन सोमाणी विद्यालयाची स्थापना सन १९९३ साली लातूरमध्ये झाली. श्रीकिशन सोमाणी प्राथमिक विद्यालय हे कायम विनाअनुदानित तत्त्वावर चालविले जात असून, माध्यमिक विद्यालय हे महाराष्ट्र स्वयं अर्थ सहायित शाळा अधिनियम २०१२ अंतर्गत मान्यताप्राप्त तत्त्वावर चालविले जाते. विद्यालयात इयत्ता बालवाडी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी या माध्यमातून शिक्षण दिले जाते. समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आणि संस्कारक्षम नागरिक बनविण्याच्या उद्देशाने या विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. मराठवाड्यामध्ये उपक्रमशील असे सेमी इंग्रजी माध्यमाचे एक उत्कृष्ट व दर्जेदार विद्यालय म्हणून या विद्यालयाची ख्याती ही शहरातील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि जाणकार लोकांना आहे. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव आणि सांस्कृतिक मूल्ये जोपासण्याचा प्रयत्न नियोजनबद्ध पद्धतीने सातत्याने सुरू आहे.
Copyright © 2017-2024. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates